हिंगोली लोकसभा मतदारसंघ.! ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची घोषणा...
![हिंगोली लोकसभा मतदारसंघ.! ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची घोषणा...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_6603e47d70320.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रत्येक जन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली करत आहे.
अशातच चार दिवसाच्या घडामोडीनंतर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमदेवर घोषीत करण्यात आला असून, ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
तर नागेश पाटील अष्टीकर यांच्या नावाची घोषणा होताच; उमरखेड येथील शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला आहे. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.