सुतार समाज राज्य महाअधिवेशनाच्या अध्यक्षपदी सुदाम खैरनार यांची निवड...

सुतार समाज राज्य महाअधिवेशनाच्या अध्यक्षपदी सुदाम खैरनार यांची निवड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक / दिंडोरी : गेल्या काही महिन्यापासून सुतार समाजाच्या अधिवेशनाची चर्चा; महाराष्ट्रभर चालू असून, याबाबत ४ ते ५ जिल्ह्यांमध्ये त्याविषयी बैठका संपन्न झाल्या. दि. 2 एप्रिल 2023 रोजी आळंदी येथील बैठकीसाठी संपूर्ण राज्यातून ५०० पेक्षा अधिक समाजातील पदाधिकारी / कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

यावेळी समाजाचे अनेक प्रश्नं कार्यकर्त्यांनी अतिशय पोटतिडकीने व कळकळीने आपआपली बाजू मांडली व महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्रिकरण करून, एकाच व्यासपीठावर यावे आणि या महाअधिवेशनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना वाच्या फोडून, शासनाकडून त्या प्रश्नांची सोडवणूक करावी असे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले.

त्यानंतर मालेगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील अनेक संघटनेच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाजअधिवेशन विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सतीश शिंदे यांनी अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार यांची निवड व्हावी असा ठराव मांडला; त्यास विश्वकर्मा विराट संघाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गवळी यांनी अनुमोदन देऊन, सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यावेळी खैरनार यांचा शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुतार समाजाचे विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.