दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीची गुरुवारी मोहाडीत बैठक...
![दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीची गुरुवारी मोहाडीत बैठक...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_6548d1b6149f0.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील महाविकास आघाडीची बैठक गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोहाडी येथील कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे मुख्य व मूळ प्रश्न तालुक्यातील चोरी जाणारे पाणी,रस्ते,वीज आरोग्य, बेरोजगारी,शिक्षण,शेतकऱ्यांच्या मालाचे भाव,इत्यादी प्रश्न संदर्भात दिंडोरी तालुक्यात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची महत्त्वाची एकत्रित बैठक होणार आहे. तरी या बैठकीस सर्व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी,माजी जि.प.सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य,माजी सभापती,आजी-माजी बाजार समिती सदस्य,आजी-माजी कादवा संचालक, आजी माझी संचालक शेतकरी संघ, तालुक्यातील सर्व विकास सोसायटीचे आजी-माजी चेअरमन व सदस्य, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे आजी-माजी सरपंच व सदस्य नगरपंचायतीचे आजी-माजी नगरसेवक मित्र,पक्षांचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे अन्याय विरुद्ध वाचा फोडण्यासाठी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश पिंगळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर भगरे , शिवसेना तालुका अध्यक्ष पांडुरंग गणोरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव रमेश चौधरी आदींनी केले आहे.