क्राईम : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या पाच परप्रांतीय आरोपींना चाकण पोलिसांकडून अटक, पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक ..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : कुदळवाडी येथील परप्रांतीय चोरांकडून चाकण पोलीस ठाणे हद्दीतील विद्युत रोहित्रा चोरी होत असल्याच्या तक्रारी चाकण पोलीस ठाण्यास प्राप्त झाल्या होत्या. त्याच अनुषंगाने शनिवार(दि.१९) रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाचे अधिकारी व अमलदार हे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही चोरटे विद्युत रोहित्रातील कॉपर वायर चोरी करण्याच्या उद्देशाने चार चाकी टेम्पो व दुचाकी वाहनाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयास्पद फिरत होते. माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकातील अमलदार यांनी संशयास्पद वाहन व वाहनातील ५ संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अधिकारी यांनी चौकशी केली असता. त्यांनी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलपिंपलगाव भागातील शेतातील व नदीच्या लगतच्या भागातील विद्युत रोहित्रा मधील कॉपर कॉईल चोरी केल्याची माहिती दिली.
या प्रकरणात आरोपी १. मोहमंद तौफिक अजम अली शेख(रा.बालघरे वस्ती,कुदळवाडी,चिखली, पुणे.मूळ रा. उत्तरप्रदेश), २. रजीउद्दीन वारीस अली खान(रा.भैरवनाथ मंदिरा जवळ,कुदळवाडी. मूळ रा.उत्तरप्रदेश),३.सेराज अहमद हमीद उल्ला शेख(रा.बालघरे वस्ती,कुदळवाडी,चिखली, पुणे.मूळ रा. उत्तरप्रदेश),४.मोहमद आसिफ अब्दुल अलीम अन्सारी(रा.बालघरे वस्ती,कुदळवाडी,चिखली, पुणे.मूळ रा. उत्तरप्रदेश),५. शकील मोहमंद वलाम्सा चौधरी(रा. पवार वस्ती,कुदळवाडी, चिखली, पुणे. मूळ रा.उत्तरप्रदेश)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात एकूण पाच चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. या कामगिरीमुळे चाकण पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्याकडून एकूण सुमारे ५ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) नाथा घार्गे, डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित चौगुले, पोलीस अंमलदार सुनील शिंदे,किरण घोडके, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, ऋषीकुमार झणकर, सुनील भागवत,रेवणनाथ खेडकर, सुदर्शन बर्डे, पोलीस कॉ.महेश कोळी, पोलीस शिपाई बिक्कड, शरद खैरनार यांनी केलेली आहे. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.