मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय.! आणि समज...

प्रतिनिधी - पुणे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व अन्य सहकाऱ्यांनी नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होता.
पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला असता; या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होता. दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी झाली आणि या सुनावणीला आज मनोज जरांगे पाटील हजर राहिले.
परंतु आज हजर झाल्याने, न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. मात्र अटक वॉरंट रद्द करतानाच कोर्टाकडून मनोज जरांगे पाटील यांना समज देखील देण्यात आली आहे. न्यायालयाविरूध्द आणि न्यायव्यवस्थेविरोधात न बोलण्याची समज न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे.
अटक वॉरंट रद्द झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2013 मध्ये पुण्यातील कोथरूड परिसरात जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत.! असा आरोप तक्रारदार व्यक्तीनं केला आहे. या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात 2013 मध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्यावर पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला चालू होता. या दरम्यान झालेल्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावला होता. त्यानंतर अटक वॉरंट काढण्यात आला होता.