श्री ईशान्येश्‍वर स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा

श्री ईशान्येश्‍वर स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील श्री ईशान्येश्‍वर विद्यानिकेतन व ज्युपीटर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक रक्षाबंधन साजरा केला.

यावेळी प्राचार्या ऋतिका कराटे यांनी सांगितले की,रक्षाबंधन सणामुळे भावा-बहिणींमधील प्रेम अतुट रहाते, भारतीय परंपरेत असलेल्या या सणामुळे कौटुंबिक एकोपा कायम राहतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक सणाचे महत्त्व जाणून घ्यावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा.आचल तिवारी यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थींनीनी पर्यावरणपुरक राख्या बनवल्या व त्या राख्या विद्यार्थ्यांना बांधल्या व वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. याप्रसंगी प्राध्यापकवृंद,कर्मचारी उपस्थित होते.