शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न...!

शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न...!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण

नाशिक : दिंडोरी शेतकरी सहकारी संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे व्हा. चेअरमन रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सण-२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात संघाला ३ लाख ६९ हजार ४५२ रुपये इतका नफा झाला आहे.सभेच्या सुरवातीला संघाचे सभासद कै.विठ्ठलराव पोपटराव जाधव व ज्ञात आज्ञात मान्यवरांना श्रध्दाजली अर्पण करण्यात आली.प्रास्तविक व स्वागत संचालक संतोष कथार यांनी केले. यावेळी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले,सन २०२३-२०२४ या वर्षाचा वार्षिक अहवाल आर्थिक पत्रकाना मंजुरी,ऑडिट मेमो,सन २०२४-२०२५ चे खर्च व उत्पन्न अंदाज पत्रक,वेअर हाऊस साठी जागा खरेदी,लेखा परीक्षक नेमणे, पोटनियंम दुरुस्ती आदी विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यावेळी सचिव संजय जाधव यांनी इतिवृत्त व इतर कागदपत्र यांचे वाचन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी व्हा चेअरमन रघुनाथ पाटील,संचालक रामभाऊ ढगे,रामदास पिंगळ,भरत कड,गुलाब तात्या जाधव, दिलीप जाधव,रघुनाथ गायकवाड,सुनील मातेरे,राहुल जाधव,सुरेश घुमरे धर्मराज राऊत,संतोष कथार,सौ. मीना मवाळ,सौ. सुमन धुमणे,स्वीकृत संचालक नामदेव घडवजे,दिनकर जाधव,नवनाथ नाठे,शशिकांत गामाणे,वाळू जगताप,बाळासाहेब महाले,प्रकाश पिंगळ,गणेश हिरे,सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.

सभासद भाऊसाहेब बोरस्ते,भिकणराव देशमुख,रमेश मुरकुटे,योगेश बर्डे,भारत खांदवे,सुभाष देशमुख,रमेश मवाळ, बाळासाहेब धुमने,आर.के.जाधव विश्वासराव देशमुख,भास्कर वसाळ,मधुकर भेरे,दिलीप चकोर,अरुण पाटील,कैलास जाधव, सीताराम जाधव,भगवान जाधव, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासद पैकी कैलास जाधव,योगेश बर्डे,भाऊसाहेब बोरस्ते,अशोक पताडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. आभार संचालक राहुल जाधव यांनी मानले.राष्टगीताने सभेचा समारोप करण्यात आला.