अबब..! प्रियसीची बहिण व तिच्या घरच्याकडून प्रियकराची यथोच्य धुलाई, प्रियकराच्या डोळ्यात मसाला पावडर गेल्याने प्रियकर थेट रुग्णालयात दाखल...!

अबब..! प्रियसीची बहिण व तिच्या घरच्याकडून प्रियकराची यथोच्य धुलाई, प्रियकराच्या डोळ्यात मसाला पावडर गेल्याने प्रियकर थेट रुग्णालयात दाखल...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील फिर्यादी मोहन सदाशिव गायकवाड(वय-२७ वर्षे) रा. साष्टपिंपळगाव, ता.आंबड, जि. जालना, सध्या राहणार खराबवाडी याचे आणि आरोपी उद्धव नारायण निर्मळ याच्या बायकोचे प्रेमसंबध असल्याने ते दोघे बर्‍याच दिवसापासून एकत्र राहत होते. यातील फिर्यादी व त्याची प्रियशीच हिच्या पहिल्या नवर्‍याच्याकडे असणार्‍या मुलांना घेऊन जाण्यासाठी ती प्रियकरासह नवर्‍याच्या घरी आले होते. त्याचवेळी प्रियशीच्या बहिणीने इतर चार व्यक्तींसह प्रियशीच्या प्रियकरास दगड, लाकडी काठ्या, मसाला पावडर डोळ्यात टाकून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन गायकवाड व आरोपी उद्धव नारायण निर्मळ याची बायको यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे प्रियकर व त्याची प्रियशी नवर्‍याला सोडून वेगळे राहत होते. १७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्पाईन सिटी वरुण प्रियकर व प्रियशी आपल्या पहिल्या नवर्‍याकडे असणार्‍या आपल्या मुलांना घेण्यासाठी खराबवाडी येथील हनुमान मंदिरा समोरील रोडवर आले. त्यानंतर प्रियशीने प्रियकराला फोन करून तुम्ही घराचे खाली थांबा मी मुलांना घेऊन येते असे सांगितले. त्यानंतर प्रियकर मोहन गायकवाड प्रियशीच्या नवर्‍याच्या घराखाली थांबला असता प्रियशीची बहीण आरोपी सीमा मोरे ही घराच्या खाली येवून तिने थेट प्रियकराच्या डोळ्यात मसाला पावडर टाकली. त्यावेळी प्रियकर जीव वाचविण्यासाठी खराबवाडी हनुमान मंदिराजवळून पळत असताना त्याचा पाठलाग करून इतर चारही आरोपी प्रियशीचा नवरा उद्धव नारायण निर्मळ, निवास गोरे, द्वारका गोरे, बाबुराव गोरे पाठीमागून आले. त्यावेळी प्रियकराला प्रियशीचा नवरा उद्धव नारायण निर्मळ याने पकडून तू माझ्या बायकोला पळून का घेऊन गेला होता? असे म्हणून प्रियकरास शिवीगाळ करून दगड मारून, सर्व पाचही आरोपींनी प्रियकरास काठ्यांनी मारहाण केली. त्यातील आरोपी द्वारका गोरे हिने प्रियकरास शिवीगाळ करून दगडाने प्रियकराच्या डोक्याला, खांद्याला व पाठीला गंभीर दुखापत केल्याने प्रियकरास तातडीने खराबवाडी गावातील आयुष हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सध्या चाकण औद्योगिक परिसरात विवाहित महिलांचे प्रेम प्रकरणे वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील एका महिन्यात अशा साधारता: चार ते पाच प्रकरणे समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. काही महिला तर आपला सुखी असलेला संसार, छोटी-छोटी पोटची मुल सोडून देऊन फक्त कोणत्या तरी आर्थिक व शारीरिक आकर्षनामुळे स्वत:चा नवरा सोडून दुसर्‍या कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीबरोबर निघून जातात असे भयावह वास्तव चाकण औद्योगिक वसाहत परिसरात पहावयास मिळत आहे. यासाठी कुठे तरी समाजात जनजागृती होणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर पोलिस ठाण्यात कार्यान्व्हित असलेली महिला दक्षता कमिटी यात सक्षम महिलांची निवड करून त्यांच्या माध्यमातून महिलांना समुपोदेशन होणे गरजेचे आहे.

या गंभीर प्रकरणात सर्व पाचही आरोपींवर भा.द.वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२६, ५०४ प्रमाणे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हे करत आहेत.