चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात...
![चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_643e31941e56c.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
चंद्रपूर : चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला मुल पोलिसांनी अटक केली आहे. यात एक विधिसंघर्ष बालकाचा समावेश असून, केलझर-अजयपूर मार्गांवर घटना घडली होती.
सविस्तर माहिती अशी कि, चिचपल्ली येथील निवासी विशाल राजकुमार दुधे हा नामक व्यक्ती इलेक्ट्रिशन चा काम करत असून,केलझर येथे आपलं काम आटोपून तीन वाजताच्या सुमारास केलझर - अजयपूर मार्गाच्या पुलाजवळुन जात असतांना,3आरोपिंनी त्याची मोटारसायकल अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून खिशात असलेले 640 रुपये बळजबरीने हिसकाऊन घेतले.
विशाल दुधे हा कसातरी आपला जीव वाचवून घरी आल्यानंतर मुल पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता,मुल पोलिसांनी काही तासाच्या आतच या प्रकरणातील केळझर येथील आरोपी 20 वर्षीय विक्की उर्फ मॅक्सवेल बळीराम मोटघरे, चिरोली येथील 23 वर्षीय शाहरुख शेख आणी चिरोली येथील एक 16 वर्षीय विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असताना,आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून,आरोपी कडून 640 रुपये हस्तगत केले.आरोपी विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जून इंगळे आणी पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे यांनी केली आहे.