BIG BREAKING: खराबवाडी गावात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांकडून मुलींशी गैरवर्तन..!

BIG BREAKING: खराबवाडी गावात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांकडून मुलींशी गैरवर्तन..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी गावातील एस. के. कोचिंग क्लासेस या खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांने त्याच्याकडे शिकवणीसाठी येत असलेल्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून व स्वतःच्या शरीराचे उघडे प्रदर्शन करून विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याने त्या लंपट शिक्षकांला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

खराबवाडी गावातील एस. के कोचिंग क्लासेस या खाजगी शिकवणीचा स्त्री लंपट शिक्षक याने शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थिनींना मागील दहा दिवसापासून अश्लील व्हिडिओ दाखवणे, विद्यार्थिनींना अश्लील शेरेबाजी करणेअसे स्त्री लंपट चाळे करत होता. यावर एका विद्यार्थिनीने पुढे येऊन त्याचे हे अश्लील बोलणे व चाळे मोबाईल फोनमध्ये संपादित केले. यानंतर घडलेला प्रकार त्या विद्यार्थिनीने आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर हा भयानक प्रकार समोर आला. 

आरोपी कलंकित शिक्षक याला चोप दिल्यानंतर त्याला महाळुंगे MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. समाज्यात शिक्षकाला विद्यार्थ्यांचा दुसरा पालक समजले जाते. पण असे जर शिक्षक समज्यात असतील तर, खरंच फुला सारख्या वाढवलेल्या विद्यार्थिनी समाज्यात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. अशा नराधमावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.