ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्या दोन युवतींपासून सावधान..!
![ब्लॅकमेल करून पैसे उकळणार्या दोन युवतींपासून सावधान..!](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_640245043c97d.jpg)
News15 प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक वसाहत चाकण व परिसरात बडे मासे गळाला लावून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या बहाण्यातून त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करणार्या दोन युवती चाकण परिसरात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीत नीलिमा दिनेश सुरवाडे, रा.पातुर, ता. पातुर, जि. अकोला व पुजा सावंत, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर नामक दोन तरुणी परिसरातील धनदांडगे लोक यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून व त्यांना अट्रॉसिटी कायद्याची भीती दाखवून त्यांच्याकडून मोठ्या पैशाची मागणी करत असल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
या दोन भामट्या युवतीपैकी पुजा सावंत ही स्व:ताला पत्रकार असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात आल्यावर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मोबाईल कॅमेरा सुरू करून पोलिसांच्यावर दबाव टाकत असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. यातून अनेक निष्पाप आणि चारित्र्य संपन्न व्यक्तीच्या आयुष्याची बर्बादी होत असल्याच्या घटना या परिसरात उघड झाल्या आहेत.
नीलिमा सुरवाडे व पुजा सावंत या दोघींचं न्याय देवतेच्या ठिकाणी करत असलेल्या अश्लील चाळयाचा एक अश्लील व्हिडिओही समाज माध्यमात फिरत आहे. त्या व्हिडिओमधील अश्लिलतेमुळे त्या दोघींच्या विकृतीचा कळस झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. समाजात जर अशा विकृत युवती असतील तर यातून नक्कीच कोणत्या तरी विघातक घटना घडल्या शिवाय राहणार नाहीत. फक्त स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी आणि महिला असल्याने कायद्याचा चुकीचा उपयोग करून काही युवती अशा वागत असतील तर, अशा प्रकरणात अन्याय झालेल्या व्यक्तींनी समोर यायला हवे. याचा नक्कीच पोलिस योग्य तो शोध घेऊन अशा विकृत युवतीवर कारवाई करतील यात कोणतीही शंका नाही.
या दोघीं युवती फक्त दिवभर कसे कुणाला फसवता येईल आणि कसे त्यांच्याकडून पैसे काढता येतील याच्याच शोधात असतात. जर एखादा बडा मासा त्यांच्या जाळ्यात अडकला आणि तो पैसे देण्यास नाटकबुल आला तर त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने अट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करायचा आणि प्रकरण मिटविण्यासाठी मोठ्या पैशाची मागणी करायची. यातून एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो किवा एखाद्या व्यक्तीची कमवलेली प्रतिष्टा धुळीस मिळाल्या शिवाय राहत नाही. तरी परिसरातील नागरिकांना विनंती आहे की, जर अशा नावाच्या युवती आपल्या संपर्कात आल्या तर थेट स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क करा.
समाजात वावरतांना इतकेही अशा विकृत महिलांच्या जाळ्यात वाव्हत जावू नका की, आपले कुटुंब, पद-प्रतिष्ठा, आपला व्यवसाय रसातळाला जावू शकतो. जर यापुढे अशा महिलांच्या प्रकरणात कुणाची फसवणूक झाली असेल किवा कुणी अशा महिलांच्या जाळ्यात ओढला गेला असेल तर अशा व्यक्तींनी पुढे येऊन पोलिस ठाण्यात तक्रार किवा आपल्या व्यथा मांडायला हव्यात. ज्यातून पोलिस नक्कीच अशा गुन्ह्यांना आळा घालतील. पण असेच गंभीर गुन्हे जर आपण दुर्लक्षित किवा स्व:ताच्या प्रतिष्ठेपाई सहन करत राहिलो तर, नक्कीच याचे भविष्यात भयंकर परिणाम भोगावे लागतील. तरी मनातील संकोचीत पणा दूर ठेऊन होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व समाज घटकांनी समोर यायला हवे.
---असा प्रसंग कुणाशी व कुणा बरोबर घडला असेल आणि तुमच्यावर अमानुष अन्याय होत असेल तर त्यांनी माध्यम म्हणून आम्हाला संपर्क केला तरी चालेल. आपल्या नावाबद्दल गुप्तता पाळली जाईल.