मोठी बातमी : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रोहित्र चोरी करणाऱ्या दोन आरोपीना अटक करून, ९ गुन्हे उघडकीस आणण्यास यश..!

मोठी बातमी : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रोहित्र चोरी करणाऱ्या दोन आरोपीना अटक करून, ९ गुन्हे उघडकीस आणण्यास यश..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे(इं): चाकण औद्योगिक वसाहतीतील ग्रामीण भागात शेती आणि औद्योगिक वसाहत करीता महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग मार्फत उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व औद्योगिक वसाहतींचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. रोहित्र चोरीच्या अनेक तक्रारी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करून या प्रकरणात दोन आरोपीना ताब्यात घेऊन त्यांनी या अगोदर एकूण ९ गुन्ह्यांची कबुली देऊन त्यांच्याकडून एकूण २ लाख ४० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कामगिरी केली आहे.

विद्युत रोहित्र चोरीची ठिकाणे ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसेच निर्माणधिन औद्योगिक वसाहतीचे निर्जन ठिकाणी होते. चोरट्यांकडून मागे कोणताही पुरावा सोडत नसल्याने गुन्हेगार शोधणे पोलिसांना जिकरीचे झाले होते. परंतु महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने रोहित्र चोरीचे कालावधी वार, वेळ यांचा बारकाईने अभ्यास करुन परिसरात संशयीतरित्या वावरणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त केली. सदर चोरी बाबत घटनास्थळाचे आजुबाजुच्या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहित तेजबहादुर सिंग(वय २७ वर्षे) रा.भोसरी, मुळगाव पतजु पहाडपुर,ता. कादीपुर, जि. सुलतानपुर, जि. उत्तरप्रदेश आणि आरोपी आकाश अखिलेश चौबे, वय २५ वर्षे, रा.भोसरी, मुळगाव साडी जगदिशपुर,ता. कादीपुर, जि. सुलतान, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेत कसुन तपास केला. आरोपीनी विद्युत रोहित्र मधील तांब्यांच्या तारा चोरल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून एकूण २ लाख ३० हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांनी केलेल्या एकूण ९ गुन्ह्यांची उकल करून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते, पोलीस निरीक्षक(गुन्हे शाखा)प्रविण कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे,राजेंद्र मोरे,राजु जाधव,राजु कोणकेरी,अमोल बोराटे, युवराज बिराजदार,विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे,गोरक गाडीलकर,प्रकाश नवले, शिवाजी दिघे,संतोष काळे,शरद खैरे, तानाजी गाडे, प्रशांत ठोंबरे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, राजेंद्र गिरी यांनी केली आहे.