क्राईम : कौटुंबिक वादातून नवऱ्याने केले बायकोवर सपासप वार..!

क्राईम : कौटुंबिक वादातून नवऱ्याने केले बायकोवर सपासप वार..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खेड तालुक्यातील करंजविहीरे गावात कौटुंबिक कारणातून क्रूरतेने नवऱ्याने बायकोवर धारधार कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आल आहे.

पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार,  गुरुवार(दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करंजविहीरे गावातील फिर्यादी संभाजी बबन कोळेकर(वय-४६ वर्षे),रा.करंजविहीरे,ता.खेड,जि.पुणे यांची विवाहित पुतणी निकिता अतिश मरगज(वय-२६ वर्षे) हि मुंबई येथे आपल्या आई-वडिलांकडे जाण्यासाठी गाडीची वाट बघत असताना. त्याठिकाणी तिचा पती अतिश अंकुश मरगज(वय-३० वर्षे)रा.करंजविहीरे,ता.खेड,जि.पुणे जो कि आपल्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरु असल्याच्या कारणावरून त्याने त्याच रागातून पत्नीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर,हातावर लोखंडी धारधार कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेत पत्नी निकिता गंभीर जखमी झाली आहे.

 सध्या संपूर्ण राज्यात महिला अत्याचार व विद्यार्थिनी यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. यावर कठोर अशी कारवाई व्हायला हवी. सध्या महिलावर अत्याचार करण्यासाठी नराधम कठोर झाले आहेत. राज्यात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या महिला अत्याचाराच्या घटना बघता शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या आणि चाकण औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिला यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासाठी सरकारने ठोस अशा उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या घटनेनंतर आरोपीला महाळुंगे MIDC पोलिसांनी अवघ्या एक तासात अटक केली आहे. त्याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१),भा.ह.का.क ४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव हे करीत आहेत.