शरद पवारांची पाटील आणि दादांवर टीका.! ज्यांना सगळं दिलं त्यांच्याकडे निष्ठा राहिली नाही...
![शरद पवारांची पाटील आणि दादांवर टीका.! ज्यांना सगळं दिलं त्यांच्याकडे निष्ठा राहिली नाही...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d6c20a0bf5f.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - मनोहर गोरगल्ले, मंचर
पुणे - मंचर येथे २१ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, विघ्नहर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले यावेळी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सभेचे प्रास्ताविक बाळासाहेब बाणखेले यांनी केले. यावेळी रोहित पवार व जयंत पाटलांनी अमोल कोल्हेच खासदार म्हणून पुन्हा निवडून येतील असे सांगितले. तर, खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीत गुबुगुबु वाजलं कि मान डोलावणारे हवेत की वाघ हवेत असा सवाल केला. पंधरा वर्षात धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी चे काम करता आले नाही ते पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत.
यावेळी शरद पवार यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानुन दलबदलुंना येत्या निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन करुन आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक विकासकामांसाठी ज्यांना अनेक पदे दिली तेच ईडी, जेलच्या भितीने रातोरात विचार, निष्ठा बदलुन मोकळे झाले. पण मतदार जागेवर असुन या स्वार्थींना येत्या निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्या सभेच्या प्रतिक्षेत असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व महिला भगिनी सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.