कोराटे ग्रामपंचायतचा वर्धापन दिन साजरा...
![कोराटे ग्रामपंचायतचा वर्धापन दिन साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_657ef2cba813b.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील ग्रामपंचायतचा नुकताच पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये गावातील माजी सरपंच रामराव पुंजा कदम, पुंजा राघू कदम, रामराव माधव कदम, शामराव भीमराव कदम, शंकर गणपत बदादे, निवृत्ती काशिनाथ कदम, शिवाजी राजाराम बदादे, संगीता भिका बदादे, कुसुम शिवाजी बदादे, अमोल नानासाहेब कदम, बाळासाहेब नामदेव कदम, रामराव निवृत्ती कदम आदींचा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच अश्विनी दोडके उपसरपंच बाळासाहेब कदम व सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अनेक माजी सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त करून गावाच्या विकासासाठी तरुणांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अंबादास कदम, शरद बदादे, संगीता शिंदे, वनिता ब्राह्मणे, ग्रामसेवक सय्यद, सुदाम शिंदे, चिंतामण कदम, वर्षा निकम, गोरख शिंदे, मोतीराम मालसाने, वर्षा निकम बाळू मोरे, विजय गवे, केशव कराटे, दामू कराटे आधी उपस्थित होते.