मोठी बातमी : श्री केश्वराज शिक्षण संस्थेत बोगस शिक्षण भरती प्रकरण समोर, उपोषणाला बसू नये म्हणून तक्रारदार यांच्यावर दबाव...!

मोठी बातमी : श्री केश्वराज शिक्षण संस्थेत बोगस शिक्षण भरती प्रकरण समोर, उपोषणाला बसू नये म्हणून तक्रारदार यांच्यावर दबाव...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

आळंदी : खेड तालुक्यातील मरकळ गावातील श्री. केश्वराज शिक्षण संस्थेत मोठा शिक्षक भरती घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक लोखंडे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण भरती घोटाळ्याचा केंद्रबिंदू खेड तालुका असल्याचे समोर आले आहे.

मरकळ येथील श्री केश्वराज शिक्षण संस्थेत साल २०११-१२ या वर्षात १९. ५ अनुदानित मान्यता पदे होती. कायमविना अनुदानितसाठी फक्त १. ५ लाच पद मान्यता देण्यात आली होती. पण २०११-१२ ला सेवाजेष्ठता यादीत ३८ शिक्षकांची बेकायदेशीर भरती केली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २०११ ते आज पर्यंत या संस्थेने शासनाची कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भातील सविस्तर तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक लोखंडे यांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांना देऊनही त्यावर अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. 

महत्वाचे म्हणजे या संस्थेचे सचिव राहुल शिंदे असं सांगत फिरत आहेत कि, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांचे माझे मधुर संबंध आहेत. त्यामुळे आमचे कुणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात असल्याने शिक्षणाधिकारी बोगस शिक्षक यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल तक्रारदार दिपक लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

तक्रारदार लोखंडे यांनी पुराव्यासह या शिक्षण संस्थेची तक्रार वरिष्ठाकडे करूनही झोपलेले अधिकारी समिती नेमून फक्त वेळ मारून नेत असल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे. शिक्षणाधिकारी यांना पुरावे देऊनही त्यांना काही खेड तालुक्यातील उच्च माध्यमिक महाविद्यालयातील उमेदवारांच्या नियुक्त्या व पद मान्यता यात जास्त रस आहे. पण त्यांना मी दिलेल्या पुराव्यावर कारवाई करायला वेळ नाही असा थेट आरोप लोखंडे यांनी केल्याने कुठे तरी बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याशी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. आता तर ते कुणाचा फोनही उचलत नसल्याचे समोर आले आहे.सामाजिक कार्यकर्ते दिपक लोखंडे यांनी याच कारभाराच्या संदर्भात उपोषणाचा इशारा दिल्या नंतर त्यांच्यावर पोलीस व इतर यंत्रणाच्या माध्यमातून दबावही टाकला जात असल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे. त्यामुळे गैरकारभार दाबण्याचा कुठे तरी प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप लोखंडे यांनी केला आहे.

संस्थेने विद्यालयासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीला PMRDA कडून बांधकामाला परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे संस्थेने बांधण्यात आलेल्या इमारतीत उद्या काही दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण? असाही सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदूळातही गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोषण आहार बनविण्यासाठी सात कामगाराचे पगार काढण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात दोनच कामगार कामावर उपस्थित असल्याचे अहवालातुन समोर आले आहे. त्यामुळे या संस्थेचे मोठं कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. पण पुढारपण करणाऱ्या राहुल शिंदे नामक सचिवाला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. यावर आता डोळे झाकून बसलेले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी चुकीचे असूनही कारभार बरोबर आहे असा निष्कर्ष काढणार कि, प्रामाणिकपणे दोषींनवर कारवाई करणार हेच पहावें लागेल.