आता शाळेतल्या गुरुजींनाही असणार गणवेश?

आता शाळेतल्या गुरुजींनाही असणार गणवेश?

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

गेल्या कित्येक वर्षांपासून शाळेचे विद्यार्थीच गणवेशात दिसत होते मात्र आता विद्यार्थ्यांबरोबर राज्यातील शिक्षकांना सुद्धा  संवर्गासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आल्याने शिक्षकवृंदही शालेय गणवेशात दिसणार आहे.  याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र निर्गमित केले आहे त्या संदर्भात काही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या असून गणवेशाचा रंग ठरवण्याचा निर्णय मात्र शाळा स्तरांवर सोपवण्यात आला आहे.

शिक्षकवृंद हा शाळेतील नव्हे तर समाजातील महत्त्वाचा दुवा आहे याशिवाय शिक्षक हे ज्ञानदानाचे काम करत असून भावी पिढी घडवण्याचे देखील काम करतात विद्यार्थी हे अनुकरण करीत असल्याने शाळेतील शिक्षकांनी योग्य व शिक्षिकेला अनुकूल व साजेशा असणे अपेक्षित आहे. यातून शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असतो.यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षक गणवेशात दिसणार आहे.

 कसा असावा गणवेश 

शिक्षकांनी हलक्या रंगाचा शर्ट गडद रंगाची फुल पेंट ट्राउझर इन केलेला असावा पायात बूट तर महिलांसाठी साडी सलवार कमीज दुपट्टा चप्पल किंवा आवश्यक असल्यास बूट परिधान करावा याशिवाय शर्टवर कुठलीही चित्र विचित्र नक्षीकाम किंवा चित्रे नसावी गडद रंगाचे कपडे जीन्स आणि टी-शर्ट घालू नये स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचे ड्रेस राहणार आहे.शिक्षकांच्या नावासमोर इंग्रजीत टी आर तर मराठीत टी असे लिहिण्यात यावे. शिक्षकांना याबाबत संबोधन व बोधचिन्ह त्यांच्या वाहनावर लावता येईल.

प्रतिक्रिया

 शासनाने शिक्षकांच्या बाबतीत जो गणवेशाचा निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य असून, यामुळे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल; याशिवाय या निर्णयाला सर्वात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज असून, नेहमीच्या वातावरणातून यात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे शैक्षणिक बाब आणखी प्रभावी होणार आहे.

संतोष कथार - शिक्षक,जनता विद्यालय दिंडोरी