राणी महाल विहिरीत एका १४ वर्षीय शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...

राणी महाल विहिरीत एका १४ वर्षीय शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसरातील राणीमहल येथील विहिरीत; महादेव संतोष डोंगरे (वय १४) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी आठाणे मंगल कार्यालय येथील घरातून सायकलवर बाहेर जाऊन येतो म्हणून गेलेला मुलगा.! परत घरी आलाच नाही. सदर मुलाचा दि. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास, राणीमहल येथील विहिरीत मृतदेह दिसून आला आहे. नागरिकांनी मुलाचे प्रेत विहिरीतून बाहेर काढले असून, घटनास्थळी उदगीर ग्रामीणचे बिट जमादार बंटी कांबळे यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.