मोळवण येथे एका 30 वर्षीय मुकबधीर महिलेचा विनयभंग...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपूर तालुक्यातील मौजे मोळवण येथे एका तीस वर्षीय मूकबधिर अपंग महिलेवर विनयभंग झाल्याची घटना आठ दिवसा पुर्वी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दि १४ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता याबाबत किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मौजे मोळवण ता.अहमदपूर येथील आरोपी बालाजी माधव दहिफळे रा. मोळवण. या आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन मूकबधिर असल्याचा गैरफायदा घेऊन वाईट हेतूने तिला जवळ घेऊन तीच्या गालाचा मुका घेतला व विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून किनगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ७४/ २०२४ कलम ३५४,४५१, भादवी सह कलम ९२ (ब ) अपंग व्यक्ती अधिकार नियम २०१६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुरुळे हे तपास करीत आहेत.