युथ ड्रीम फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण

युथ ड्रीम फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

परनार्ड रिकार्ड कंपनी व युथ ड्रीम फाउंडेशनच्या तालुक्यातील शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण अवनखेड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिंडोरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी, सरपंच नरेंद्र जाधव,पत्रकार संघाचे संस्थापक संतोष कथार,फाउंडेशनचे संचालक सौरभ सर,रमण टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये कला कौशल्य कसे ओळखणे गरजेचे आहे असे सांगत आपल्याला ज्या शिक्षणात रुची आहे ते शिक्षण घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावे असे सांगितले. सौरभ यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरीब व होतकरू मुलांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी फाउंडेशन अविरत अर्थसाह्य करीत असल्याचे सांगितले गेल्या चार वर्षात युथ ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून२.५ कोटी पर्यंत शिष्यवृत्ती वितरित झाल्याचे सांगितले या शैक्षणिक वर्षांमध्ये ३७९ विद्यार्थ्यांना ४२ लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती वितरित करणार असल्याचे सांगितले. सरपंच नरेंद्र जाधव यांनी युथ ड्रीम फाउंडेशन ग्रामीण भागामध्ये शास्वत विकास करण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावी व आपल्या बरोबरच ग्रामीण भागाचा विकास घडवून आणावा असे सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी प्रेरणा दिली. 

पत्रकार संघाचे संतोष कथार यांनी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती मिळत असल्याने या विद्यार्थ्यांना नक्कीच त्या शिष्यवृत्तीचा फायदा होत असून हे विद्यार्थी आपलं भविष्य घडवत आहे. ड्रीम फाउंडेशन प्रोजेक्ट मॅनेजर रमण टेकाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून दिंडोरी व इतर तालुक्यातील ४० गावांचा व २७ शाळा आणि महाविद्यालयांचा संपर्क फाउंडेशनची संलग्न असल्याचे सांगितले. तसेच अनेक  महाविद्यालयातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी या फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याचे संगीतले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले.ऋतुजा मोरे प्रतिक्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि युथ ड्रिमर्स फाउंडेशनचे प्रोग्रॅम असोसिएट मॅनेजर  संकेत देशमुख यांनी आभार मानले. याप्रसंगी उपस्थित युथ ड्रिमर्स फाउंडेशनचे प्रोग्रॅम असोसिटे मॅनेजर पंकज जाधव व भाग्यश्री टर्ले आणि विविध विद्यालय व महाविद्यालयांचे कर्मचारी, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांचे पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.