भोकर फाट्या जवळ ट्रक आणि बुलेटचा भीषण अपघात.! २ जागीच ठार...
![भोकर फाट्या जवळ ट्रक आणि बुलेटचा भीषण अपघात.! २ जागीच ठार...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_645db8d048a78.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : शीवराज पाटील होनशेटे
नांदेड : मुदखेड तालुक्याच्या बारड पोलीस स्टेशनच्या हद्दीत; ट्रक आणि बुलेट मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याने, या अपघातात २ जण जागीच ठार झाले आहेत. तर घटनेनंतर राज्य महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील बारड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या; भोकर फाट्या जवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या अपघातात नांदेड शहराच्या चौफाळा भागातील व पंचशील नगर येथील रहिवासी संदीप गौतम काळे व राहुल बाबुराव कोलते हे दोघे जगीच ठार झाले.
भोकर येथे लग्न समारंभ आटपून समारंभातून भोकरकडून, नांदेड कडे जात असताना; बारड जवळ बुलेट क्रमांक MH26 BZ2036 या गाडीला ट्रकने धडक दिल्यामुळे दोघेजण जागीच ठार झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.