जेवली येथे अग्नीतांडव.! 5 घरे जळून खाक तर; 7 जनावरांचा होरफळून मृत्यू...
![जेवली येथे अग्नीतांडव.! 5 घरे जळून खाक तर; 7 जनावरांचा होरफळून मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65cd9238d7e6b.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
उमरखेड तालुक्याच्या बिटरगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या; जेवली या गावात दि. 14 रोजी दुपारी 3 वाजता अचानक आग लागल्याने घराला लागून असलेल्या गोठ्यातील सात जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तसेच घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पाच घरे उघड्यावर आली आहेत. दुपारी सर्व मजूर शेतकरी कामावर गेले असता; ही आग लागली. उमरखेड येथील अग्निशामक दल पोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात आले. परंतु, तोपर्यंत पाच कुटुंबाचा संसार उध्वस्त झाला होता. पुढील तपास बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रेम केदार हे करीत आहे.