आमदार सत्यजित तांबे यांचे कार्य कौतुकास्पद - श्रीराम शेटे

आमदार सत्यजित तांबे यांचे कार्य कौतुकास्पद - श्रीराम शेटे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार झाल्यावर एक वर्षात केलेले कार्य कौतुकास्पद असून, समाजातील शेतकरी, कामगार, शिक्षक, वकील, डॉक्टर, पदवीधर बेरोजगार या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम सत्यजित तांबे करत आहेत. त्यांच्या माध्यमातून भविष्यात अनेक मोठी कामे मार्गी लागतील असा आशावाद कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी व्यक्त केला.

कादवा सहकारी साखर कारखाना येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून दिंडोरी तालुक्यातील १७ शाळांना शेटे यांच्या हस्ते संगणक वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी चेअरमन श्रीराम शेटे बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भास्कर भगरे, अण्णा थोरात, अनिल  देशमुख, नाना कोल्हे, वसंतराव जाधव, सचिन वडजे आदी उपस्थित होते. यावेळी वर्षपूर्ती निमित्त सत्यजित तांबे यांनी तयार केलेल्या आरंभ या पुस्तिकेचे देखील मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. भास्कर भगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील ५४ तालुक्यात सत्यजित तांबे आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे असे सांगितले. अण्णा थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले; तर शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन वडजे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्राधान्याने संगणक दिल्याबद्दल आमदार तांबे यांचे आभार मानले.

याप्रसंगी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा करंजवण, आंबे, दिंडोरी, तळेगाव, वनी, पालखेड बंधारा, जोपुर, चाचडगाव, राजापूर, तिसगाव, धोंडाळ पाडा, पिंपळगाव, केतकी, जोरणवाडी, करंजी, शासकीय आश्रम शाळा गोपेगाव, ओझरखेड, दहेगाव या गावातील शाळांना संगणक वितरण करण्यात आले. यावेळी १७ जि. प. प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक, शालेय समिती अध्यक्ष गावातील सरपंच / उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.