५ मार्च पासून विज कंत्राटी कामगारांचे; बेमुदत काम बंद अंदोलन...
![५ मार्च पासून विज कंत्राटी कामगारांचे; बेमुदत काम बंद अंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65d055b38f96d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त समितीच्यावतीने, दि ५ मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसिदार यांच्यामार्फत शासनास देण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदाच्या जागेवर अनेक वर्षापासून हजारो कामगार काम करीत आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा वरीष्ट पातळी वरून सुरू असून. दिलेल्या निवेदनाची वेळीच दखल न घेतल्यास ५ मार्च २०२४ पासून संपावर जाण्याचा इशारा वीज कंत्राटी कामगार कृती समितीने कंत्राटी कामगार यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे
निवेदन करते.! पद्माकर मोहनराव हनुमंते, जिल्हा सचिव कंत्राटी कामगार सघटना लातूर, व्यंकटराव पंढरी दहिफळे जिल्हा उपाध्यक्ष, प्रमोद हिप्परगेकर, गोरे सुधीर, श्याम गंगाखेड, प्रमोद कांबळे, कासले ऋषिकेश, तुकाराम मुसळे, संतोष गायकवाड, गंगाराम सुरनर अहमदपूर इत्यादी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे.