राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत लोहिया कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश...
![राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत लोहिया कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश...](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_6481b3efe7e2d.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सुधीर शिवणकर
गोंदिया / सडक अर्जुनी : सौंदड येतील लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित; लोहिया कान्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी.! रविवार दि. 4 जून रोजी जिनियस च्याम्पस अक्याडमी रघुजिनगर, नागपूर तर्फे राष्ट्रीय स्तरावर अबॅकस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लोहिया कान्हव्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल सौंदड येथील बारा विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.
त्यापैकी तापेंद्र उमाकांत भांडारकर ह्या विद्यार्थ्याने द्वितीय तर राहूल गोपाल अग्रवाल ह्या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच इतर सहभागी विद्यार्थांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी मॅडम तसेच कीर्ती पांडे यांना दिलेले आहे. ह्या विदयार्थ्यांचे जगदीश लोहिया - संस्थापक लोहिया शिक्षण संस्था, पंकज लोहिया - संस्था सदस्य, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे तसेच प्राध्यापक आर. एन अग्रवाल यांनी अभिनंदन केले आहे व पुढील यशाकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.