लातूर लोकसभा.! महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी...
![लातूर लोकसभा.! महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_661622c558f08.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
महाविजय 2024 या अभियानांतर्गत लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी जळकोट शहरात नागरिक, व्यापारी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली व आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात विविध विषयावर संवाद साधला तसेच शहरातील नवीन श्रीराम मंदिर व शिवपार्वती मंदिरात जाऊन मनोभावे पूजन करून दर्शन घेतले .नागरिकांच्या वतीने सत्कार स्वीकारला उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला. शहरातील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. जळकोट शहरातील मार्केट यार्ड परिसरात विविध व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या.
यावेळी लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे ,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे , जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड ,भारतीय जनता पा युवा मोर्चा चे ग्रामीण अध्यक्ष अमोल निडवदे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, अरविंद नागरगोजे भाजपा महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्ष श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, शिवसेना (शिंदे गट) उमाकांत इमडे, रिपाइंचे विनोद कांबळे ,शहराध्यक्ष भाजपा शिवानंद देशमुख ,सोमेश्वर , गोपाळ देवशेट्टे, सूर्यकांत धूळशेट्टे,अविनाश वाघमारे . व्यंकट तेलंग, रामेश्वर पाटील ,चाटे मामा, निलेश गाडेकर ,धर्मपाल देव शेट्टे,विवेकानंद देवशेट्टे,भाऊराव कांबळे, साधू लोणीकर नरेश सोनवणे प्रसाद नाईकवाडे ,मयूर पटणे यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.