शरीराची लाही लाही होत असतानाही, गुळाच्या चहाला ग्राहकवर्गाची पसंती...

शरीराची लाही लाही होत असतानाही, गुळाच्या चहाला ग्राहकवर्गाची पसंती...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी शहरासह ग्रामीण भागात उन्हाळ्यात शीतपेय  पिण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत, मसाला ताक, उसाचा रस, व लस्सीचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते मात्र असे असले तरी एवढ्या कडक उन्हाळ्यातही नागरिकांचे चहा वरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही कारण उन्हाचे चटके बसत असतानाही चहाप्रेमींची काडीमात्र संख्या कमी न होता ती वाढतच आहे याशिवाय त्यामध्ये विशेष करून चहाचा वेगवेगळ्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

काही वर्षांपूर्वीच्या चहा म्हटल की एकच प्रकारचा चहा आपल्याला माहीत होता.मात्र आता चहाचे अनेक प्रकार बाजारात आले आहे वेगवेगळ्या चवीत हवा तसा चहा उपलब्ध आहे आद्रक, लेमन, गुळ, ब्लॅक टी, ग्रीन टी, गवती चहा,अशा फ्लेवर मध्ये चहा उपलब्ध आहे आता चहाची आकर्षक फ्रेंचायची विकत घेऊन अनेक ठिकाणी आउटलेट उघडली आहे.दिंडोरी शहरास अनेक ठिकाणी ग्रामीण भागातही ट्रेड पाहायला मिळत आहे.कार्पोरेट लूक आणि प्रतिष्ठा आलेल्या चहाच्या व्यवसायातून आज नवतरुण रोजगार कमवत आहे.

चौकट...

१) गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी शहरांमध्ये अनेक ठिकाणी गुळाच्या चहाचे स्टॉल लागल्याने आहे मजूर ऑफिशियल कामगार व इतर नागरीक यांच्या पसंतीनुसार चहा मिळत असल्याने या गुळाच्या चहाने शरीरात एक प्रकारे ऊर्जा निर्माण होऊन थकवा दूर होतो व काम करण्यास स्फूर्ती मिळते याशिवाय हा चहा आरोग्याला लाभदायी असल्याने समाधान मिळते.

- संदीप गुंजाळ

२) कडक उन्हाळा असूनही गुळाच्या चहा विक्रीमध्ये कुठेही घट झालेली नाही चहा पिण्याला नागरिक आजही पसंती देत आहे.त्याचे कारणही तसेच आहे साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्यदायी चांगला असतो.

- दत्तात्रय (बाजीराव) कोरडे, जानोरी