ठिबकचे थकीत अनुदान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. गतवर्षीचे ठिबक आणि तुषार सिंचनाचे थकीत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करावे आणि गेल्या खरीप हंगामातील सोयाबीनचा १०० टक्के पीकविमा शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. जवळपास दीड तास हे आंदोलन चालले. यावेळी संघटनेच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन आणि साडी, चोळी आणि बांगड्यांचा आहेर देण्यात आला. मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.