धक्कादायक घटना.! झोपेत असलेल्या महिलेच्या गळा आणि छातीवर वार'करून हत्या...

धक्कादायक घटना.! झोपेत असलेल्या महिलेच्या गळा आणि छातीवर वार'करून  हत्या...

NEWS15 प्रतिनिधी - किरण मुक्कावार 

यवतमाळ : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, दिवसेंदिवस महिलेवरील अत्याचार, हत्या, छळ अशा घटना वाढत आहेत. राज्यातील पोलीस प्रशासन मात्र या घटनावर नियंत्रण ठेवण्यात कुठतरी कमी पडत असल्याची चर्चा नगरिकांमधून होत आहे. 

तर अशीच एक मन हेलवणारी धक्कादायक घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडली असून, या हत्याकांडाने मानवीवृत्तीला कालिमा फासली आहे. आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका महिलेची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे.! नराधम आरोपीने महिलेच्या छातीवर वार'करून महिलेची हत्या केली आहे. सदर २३ जून रोजी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता दत्ता मुधोळकर रा. बोरगाव (वय 45) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिला तिच्या राहत्या घरी खाटेवर झोपली असताना; अज्ञात इस्मानी येऊन धारदार चाकूने तिच्या छातीवर वारकरून जिवानिशी ठार केले. याबाबतची माहिती (तक्रार) बाबाराव निंबोळे वय 34 रा. बोरगाव यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी माहितीच्या आधारे व घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता; आरोपी विरुद्ध कलम 302 भादविप्रमाणे गुन्हा नोंद करून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिलखेलकर यांचे मार्गदर्शनात, श्याम सोनटक्के, शिवराज पवार, जमादार सतीश चौधरी, अशोक टेकाळे, अरविंद जाधव मनोज चव्हाण विशाल गावंडे, अतुल पवार करीत आहे.