क्राईम : भावाकडून चुलत्याला व चुलत भावाला बेदम मारहाण.!
![क्राईम : भावाकडून चुलत्याला व चुलत भावाला बेदम मारहाण.!](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b4861274a7a.jpg)
News15 मराठी विशेष प्रतिनिधी
पुणे(मंचर) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेड गावात गवताच्या वळई खाली पाणी गेल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांत तुंबळ हाणामारी झाली त्यात चुलत भाऊ व वयस्कर चुलता गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीवरून, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेड गावातील फिर्यादी नवनाथ बाबाजी चव्हाण(वय-४० वर्षे),धंदा-शेती, रा.पारगाव तर्फे खेड, ता.खेड, जि.पुणे हे आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावातील गट नंबर १०२२ मध्ये नवनाथ चव्हाण यांची शेत जमीन असून त्या लगतच आरोपी चुलत भाऊ कैलास मारुती चव्हाण यांचीही शेत जमीन आहे. नवनाथ चव्हाण यांच्या शेतातील गवताच्या वळइच्या खाली आलेल्या पाण्याचा पाट चुलत भाऊ कैलास चव्हाण यांच्या शेतातून परत नवनाथ चव्हाण यांनी शेतात वळवून दिला. यावरून आरोपी चुलत भाऊ कैलास मारुती चव्हाण व चुलत पुतण्या ज्ञानेश्वर कैलास चव्हाण हे माझ्या शेतात येऊन त्यांनी नवनाथ चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी करून आमच्या शेतात पाणी का सोडले असे म्हणू लागले त्यावर नवनाथ चव्हाण यांनी तुम्ही पण माझ्या शेतात पाणी सोडले होते असे म्हणताच आरोपी कैलास चव्हाण याने नवनाथ चव्हाण यांना धक्का देऊन खाली गाळात पाडले. यानंतर नवनाथ चव्हाण यांचा पुतण्या ज्ञानेश्वर चव्हाण हा नवनाथ चव्हाण यांच्या अंगावर बसला त्यानंतर चुलत भाऊ कैलास चव्हाण याने शेजारी पडलेला दगड उचलून डोक्यात मारून फिर्यादीला जखमी केले.
आमच्यातील भांडणे वाढल्याचे बघून फिर्यादीचे वडील बाबाजी चव्हाण हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता, त्यांच्या उजव्या डोळ्यात चुलत भाऊ कैलास चव्हाण बोट घालून गंभीर दुखापत केली. त्यानंतर फिर्यादीची पत्नी हे तिथे पळत आले त्यावेळी दोनही आरोपी वयस्कर बाबाजी चव्हाण यांना मारत होते. त्यानंतर आरोपींनी बाबाजी चव्हाण मारहाण करून तिथून निघून गेले.त्यानंतर फिर्यादी व त्यांचे वडील यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी वाय.सी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या गंभीर घटनेची दखल घेऊन मंचर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ११८(१),११८(२), ११५(२),३५२,३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.