मुडाणा येथे मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत; अमृत कलश प्रभातफेरी संपन्न...
![मुडाणा येथे मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत; अमृत कलश प्रभातफेरी संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_650c2e82123b6.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि. प. केंद्रिय उच्च प्राथमिक शाळा मुडाणा येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामपंचायत कार्यालय मुडाणा येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य,सचिव व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्तीक कार्यातून, "आजादी का अमृत महोत्सव " उपक्रमांतर्गत" मेरी मिट्टी, मेरा देश" हे अभियान आज दि. 20 सप्टेंबर रोजी घेण्यात आले.
अमृत कलश विद्यार्थीनींनी डोक्यावर घेऊन संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली. सामाजिक एकता व सर्वधर्मसहिष्णूता, एकता व एकात्मतेचा, भारतमातेचा जयघोष केला. गावातील नागरिकांनी, महिलांनी अमृत कलशामध्ये तांदूळ व माती टाकून भारत मातेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. प्रभात फेरीदरम्यान बैंड पथकातील विद्यार्थी व लेझीम पथकातील विद्यार्थीनींनी विशेष कामगिरी केली.
या कार्यक्रमासाठी महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच वैभव बरडे सरपंच ग्रामपंचायत मुडाणा, रमेश जाधव उपसरपंच, डॉ.अवधूतराव वानखेडे मुख्याध्यापक उ. श्रेणी, श्री. पतंगे ग्रामसेवक व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामलाल जाधव सर, प्रल्हाद राठोड सर, व्यंकटेश बोईनवाडसर, ओंकार तिवडकर सर, कु.वनिता गोविंदवार मॅडम, कु.बि.एन.लहाने मॅडम, कु.उषा शिंदे मॅडम, कु. ज्योती अंबुलगे मॅडम आदी शिक्षकांनी व अंगणवाडी सेविका व विद्यार्थयांनी अथक परिश्रम घेतले.