मोठी बातमी : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास..!

मोठी बातमी : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास..!

News15 मराठी विशेष प्रतिनिधी 

दिल्ली : डॉ.मनमोहन सिंह (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंह भारताचे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा गाजली होती. डॉ. मनमोहन सिंह यांना सय्यमी राजकारणी म्हणून ओळखले जायचे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी आता पर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी करण्यात आली होती. डॉ. मनमोहन सिंह यांना सर्वच राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली..