BIG BREAKING : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई, संगमनेर तालुक्यातील ट्रॅकर चोर पकडला..!

BIG BREAKING : महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई, संगमनेर तालुक्यातील ट्रॅकर चोर पकडला..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे(इं) : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिंद्रा ट्रॅकर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून २ गुन्हे उघडकीस आणत एकूण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घडाकेबाज कारवाईने महाळुंगे MIDC पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, १२ एप्रिल रोजी पहाटे २:४५ वाजताच्या सुमारास निघोजे येथील जामदार वस्ती येथून ७ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा सरपंच ८८५ ट्रॅक्टर ट्रॉलीसह फिर्यादी अमर रामदास येळवंडे(वय-२५ वर्षे) यांच्या राहते घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यानी चोरून नेले होते.

याच गुन्ह्याच्या अनुषंगाने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या आदेशावरून घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्या आधारे निघोजे येथील येथील ट्रॅक्टर चोरी गेलेले ठिकाण ते आळेफाटा असा अंदाजे ७० किलोमीटर पर्यंत चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतला असता. सदरचा गुन्हा आरोपी अनिकेत उद्धव कडलग(वय-२८ वर्षे), रा. जवळे कडलग, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, याने केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यास संगमनेर येथून ताब्यात घेवून त्याची चौकशी करून त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जाधववाडी, चिखली येथून आणखी एक पीकअप चोरी केली असल्याचे सांगितले. असा एकूण आरोपीकडून एकूण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपीकडून दिघी पोलीस ठाणे २ गुन्हे, संगमनेर पोलीस ठाणे १ गुन्हा तर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक(गुन्हे) प्रविण कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहाय्यक पोलीस फौजदार राजू जाधव, राजेंद्र कोणकेरी, पोलीस हवालदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार,विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, पोलीस नाईक संतोष काळे, पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे, मंगेश कदम, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, राजेश गिरी, शरद खैरे यांनी केली आहे.