लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणबोरी येथे रूट मार्च...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणबोरी येथे रूट मार्च...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात आगामी लोकसभा निवडणुका जाहीर केल्यानं; राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यासह पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च रोजी एस.डी.पि.ओ रामेश्वर वैजने व ठानेदार दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वात.!

पाटणबोरी आऊट पोस्ट'च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सी.आय.एस.एफ फोर्स सह पाटणबोरी येथील मुख्य बाजारपेठ तथा क्रिटिकल बूथ वर रूट मार्च केले.

यावेळी नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत निर्भीड होऊन मतदान करावे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. सी.आय.एस.एफ जवानांना पाहून लहान चिमुकल्यांनी त्यांचे सोबत बातचीत करून फोटो सुद्धा काढले. चिमुकल्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.