शहीद जवान संभाजी केंद्रे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण...
![शहीद जवान संभाजी केंद्रे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64b27eda3e775.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील जवान संभाजी केंद्रे हे अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा बजावत असताना; हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांना वीरमरण आले आहे. त्यांचे पार्थिव लातूरला आणण्यात येत असून, त्यांच्या मूळ गावी केंद्रेवाडी येथे रविवार सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रेवाडी गावात शोककळा पसरली.
संभाजी केंद्रे गेल्या 17 वर्षे भारतीय सैन्यात सेवा देत होते. त्यांनी आतपर्यंत जम्मू काश्मीर, भोपाळ, श्रीनगर, अहमदनगर येथे सेवा बजावली आहे. संभाजी केंद्रे गेल्या दोन वर्षांपासून अरुणाचल प्रदेशात सेवा बजावत होते. दि. 13 जुलै रोजी रात्री 9 वा. अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात उपचार सुरू असताना; दुपारी 12 वा. च्या सुमारास त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांना वीरमरण आले.
शाहिद संभाजी केंद्रे यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
संभाजी केंद्रे यांना भारत मातेची सेवा करण्याचं सप्न होत. त्यामुळे ते जिद्दीने आर्मीमधे भरती झाले. शेवटच्या श्वासापर्यंत भारत मातेची सेवा करताना वीरमरण त्यांनी पत्करले. केंद्रे यांच्या निधनाचे वृत्त गावात समजताच गावात शोककळा पसरली आहे.