सरसाळे येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन, आत्महत्या.! कारण अस्पष्ट...

सरसाळे येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन, आत्महत्या.! कारण अस्पष्ट...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सरसाळे येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर या घटनेनंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  पुंडलिक उत्तम गांगोडे ३०   सरसाळे ता. दिंडोरी जि. नाशिक असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत मयत शेतकर्‍याच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार.! माझा भाऊ (मयत - पुंडलिक उत्तम गांगोडे ) शनिवारी दि. १४ जानेवारी रोजी ६ च्या दरम्यान आपल्या राहत्या घरी; घराच्या आडगाईला साडीने साह्याने गळफास घेतला. माहिती मिळताच त्यांना वनी येथील ग्रामीण रुगरुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत  घोषित केले आहे. अशी माहिती पोलिसांना दिली. तर आत्महत्येचे अद्याप कारण कळू शकले नाही. 

या घटनेचा पुढील तपास वनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम शेलार करीत आहे.