राजगुरूनगर सहकारी बँकेचा निकाल हाती, भीमाशंकर सहकार पॅनलला राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलची कडवी झुंज...!

राजगुरूनगर सहकारी बँकेचा निकाल हाती, भीमाशंकर सहकार पॅनलला राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलची कडवी झुंज...!

News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

खेड : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले आहे. सरळ भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलने कडवी झुंज देत ४ जागावर विजय मिळवला. तर भीमाशंकर सहकार पॅनलने १३ जागावर विजय संपादन केला.

एकूण सर्वसाधारण २३ उमेदवारांच्या पैकी विजयी झालेले १२ उमेदवार पुढील प्रमाणे...

१) किरण आहेर -१०८२२

२) गणेश थिगळे - ९९५९

३) अरुण थिगळे - ८८०७

४) सागर पाटोळे - ८६५९

५) किरण मांजरे - ८६४६

६) राहुल तांबे - ८३९७

७) राजेंद्र वाळुंज - ७८८४

८) दिनेश ओसवाल - ७८७०

९) विनायक घुमटकर - ७८४२

१०) राजेंद्र सांडभोर - ७२४२

११) समीर आहेर - ७१९२

१२) दत्तात्रय भेगडे - ७१७३

विजयी महिला उमेदवार....

१) विजया शिंदे - ९८१०

२) अश्विनी पाचारणे - ९०६४

तर अनुसूचित जातीतुन "विजय डोळस" हे अगोदरच बिनविरोध निवडून आले होते...

महिलांच्या लढतीत नवख्या अश्विनी पाचारणे या दोन वेळा संचालक म्हणून काम पाहिलेल्या हेमलता टाकळकर यांच्यावर भारी भरल्याची चर्चा आता खेड तालुक्यात रंगू लागली आहे... आता बॅंकचे संचालक म्हणून निवडून आलेले कारभारी कसा बँकेचा कारभार करतात हेच पहावे लागेल.