कॉंग्रेस'ला सर्वात मोठा धक्का? जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव...
![कॉंग्रेस'ला सर्वात मोठा धक्का? जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव...](https://news15marathi.com/uploads/images/202411/image_750x_6741959099636.jpg)
संगमनेर - प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सगळ्यात धक्कादायक निकाल समोर आला असून, काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसलाय.
सलग 8 वेळा थोरात संगमनेरमधून आमदार म्हणून निवडणून आले होते.
निवडणूक लढणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना नवख्या तरुणाने पराभूत केलं आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला आहे.