वेळेत जात वैधता प्रमाणपत्र जमा करूनही, मोळवणच्या सरपंच झाल्या अपात्र...

वेळेत जात वैधता प्रमाणपत्र जमा करूनही, मोळवणच्या सरपंच झाल्या अपात्र...

NEWS15 प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील मोळवण येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये पार पडली. यात राखीव असलेल्या सरपंच पदी गीता व्यंकट दहिफळे या निवडून आल्या; त्यानंतर त्यांनी मुद्दतीत तहसील कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र  सादर केले. मात्र.! तहसील प्रशासनाने प्रमाणपत्र पुढे दाखल न केल्याने, सरपंच गीता व्यंकट दहिफळे यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. दरम्यान ही कारवाई मागे घेण्याची मागणी दहिफळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, मोळवण गावच्या आरक्षित ग्रामपंचायत सरपंच पदी गीता व्यंकट दहिफळे उर्फ फड कोंडाबाई नाथराव या २०२१ मध्ये झालेल्या निवडणूकीत निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी दि. ०५/१०/२०२१ रोजी जात वैधता प्रमाणपत्र तहसील व पंचायत समितीच्या कार्यालयात जमा केले. मात्र तहसील कार्यालयाने ते जात वैधता प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे गरजेचे असताना ते सादर न झाल्याने, सरपंच अपात्र झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी लातूर यांनी आरक्षित जागी निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने; त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यात गीता दहिफळे यांचे नाव आल्याने त्यांना धक्काच बसला. याबद्दल त्यांनी चौकशी केली असता माहेरकडील नाव व सासरकडील नाव वेगळे असल्याने असा प्रकार झाल्याचे समजते; आता अपात्रेची झालेली कारवाई मागे घेण्याची मागणी सरपंच गीता दहिफळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.