पालखेड बंधारा / मारुती फाटा परिसरात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू...
![पालखेड बंधारा / मारुती फाटा परिसरात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_648a836736f43.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक - दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील; मारुती फाटा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने, शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या बिबट्याने काल रात्री मारुती फाटा येथील शेतकरी मोसीन सय्यद यांच्या गोठ्यातील गाईवर 11 च्या सुमारास हल्ला करून ठार केल्याने; या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
याआधीही या परिसरात बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या गाई तसेच पाळीव कुत्रे यांची शिकार केल्याने, येथील शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान झाले आहे. तर प्रशासनाकडून मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्यात येतात परंतु; या शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक लाभ मिळाला नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे अतोनात नुकसान होत असून, याबाबत कोणालाही सोयरेसतुक नसल्याने शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरी संबंधित विभागाने या बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.