मराठा आरक्षण संदर्भात; साक्री येथे अत्यावश्यकच सेवा वगळता साक्री शहर कडकडीत बंद...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - खंडेराव पवार, धुळे
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतेतेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांनवर; प्रशासनाच्या अमानुष लाठी हल्ल्याचे साक्री तालुक्यातही तिव्र स्वरूपाचे पडसाद उमटले आहेत. साक्री शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर निषेध आंदोलन करत; शहरातून भव्य मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच साक्री तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात बहुसंख्येने असणारा मराठा समाज गेल्या 40 वर्षापासून आरक्षणाची मागणी करतो आहे. परंतु तरी देखील आजवर समाजास आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा शांततेच्या मार्गाने आंदोलन झाली. मोर्चे काढले गेले. मात्र, अद्याप आरक्षणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. मध्यंतरीच्या काळात आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो कायदेशीर बाबींवर टिकला नाही. अशावेळी मराठा समाजास कायदेशीरदृष्ट्या कायमस्वरूपी टिकेल असेच आरक्षण लवकरात लवकर दिले जावे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट पासून मराठा समाजबांधव मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला राज्यभरातून समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात गेल्या तीन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला. यात हजारो समाजबांधव, महिला भगिनी यात गंभीर जखमी झाल्या असून, हा संपूर्ण प्रकार अतिशय संतापजनक आणि चीड आणणारा आहे. अशावेळी या आंदोलनात लाठीमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यकाळात मराठा समाजातर्फे आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.