देशातील मुलींची पहिली शाळा "वास्तू" वाचवण्यासाठी, पुण्यात आंदोलन सुरू...
NEWS15 प्रतिनिधी : राजेश देवडकर
पुणे : अनेक त्याग आणि संकटांचा सामना करत; देशातील गोरगरिबांच्या लेकरांना विशेषत: मुलींना देखील शिक्षण मिळावं यासाठी.! थोर व्यक्तिमत्व महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी अंगावर शेण, दगड, चिखल सर्व काही झेलून अखेर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर असलेल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. परंतु आज घडीला या वास्तूची अत्यंत दुरवस्था झाली असून, या ऐतिहासिक भिडे वाड्याचे जतन करून त्याला राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे.! अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली आहे.
सरकारचं या मागणीकडे लक्ष वेधलं जावं म्हणून.! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे भिडे वाडयाबाहेर उपोषणाला बसले आहेत.
विशेष म्हणजे कालपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, राज्यातील अनेक प्रश्नावर यात चर्चा झाली. मात्र आपल्या या ऐतिहासिक ठिकाणाची चर्चा झाली नसल्यानं याबद्दल वाईट वाटत असून, आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे वाडयाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा बाबा आढाव यांनी दिला आहे.
तर याघटनेची दखल सरकार घेणार का? या क्रांतिकारी वास्तूचे जतन होणार का? ही वास्तू राष्ट्रीय स्मारक होणार का? यासह अनेक प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री आज विधानसभेत देणार का.! याकडे आंदोलन कर्त्यांचे लक्ष लागून आहे.