अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकरता सभा संपन्न...

अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकरता सभा संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

गोंदिया : दि.३१ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकर्ता सभा; अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणारे गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तिन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ता सभा नवेगावबांध येतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आली होती.

या सभेला विशेष मार्गदर्शक म्हणून, माजी शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके, जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड, सडक अर्जुनि तालुका अध्यक्ष मधुभाऊ दोनोडे, मोरगाव अर्जुनि तालुका अध्यक्ष घनश्याम धामट, गोरेगाव तालुका अध्यक्ष देवेंद्र रहांगडाले आदी उपस्थित होते.

यावेळी मतदारसंघात आपला आमदार आपला खासदार निवडून आणा.! पक्षातील हेवेदावे असतीळल तर बाजूला सारून पक्षासाठी एकत्र येऊन काम करा असे पुरके म्हणाले. यावेळी अब की बार काँग्रेस सरकार असा नारा देऊन कार्यकर्त्याना जोश दिला.