चाकण शहराच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी कटिबद्ध –शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सध्या चाकण शहराला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाची सोडवणूकी बाबत मी एक सत्ताधारी पक्षाचा शहर प्रमुख म्हणून कटिबद्ध असल्याचा विश्वास शिवसेनेचे चाकण शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
मागील बर्याच वर्षापासून चाकण शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रश्न भेडसावत आहे. त्या प्रश्नासाठी अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न करूनही त्याची सोडवणूक होत नव्हती. पण आमच्या पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहराच्या नागरिकांचा पाणी प्रश्न थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी मांडून या प्रश्नाची कशी सोडवणूक करता येईल या दृष्टीने पाठपुरावा मी एक पक्षाचा पदाधिकारी आणि चाकण मधील जबाबदार नागरिक म्हणून पाठपुरावा सुरू केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका खाजगी कार्यक्रमासाठी चाकण शहरात आले असता आम्ही सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा सुरू असलेल्या पाणी प्रश्नाच्या बाबत मुख्यमंत्री यांच्या बाब लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ विलंब न करता संबंधित विभागाच्या अधिकारी यांना सूचना देऊन तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दुसर्याच दिवशी पुणे पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र राहणे यांनी बैठक बोलावून तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा डी.पी.आर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून तयार करून तो तातडीने मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तो आराखडा मंत्रालय स्तरावर पाठविण्यातही आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्स्थान महाअभियान या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेला अंतिम स्वरूप देऊन त्यांनी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सागीतले. या योजनेला खर्या अर्थाने निधी उपलब्ध झाल्यानंतर मूर्त स्वरूप येणार आहे. मुख्यमंत्री यांनी चाकण शहर व परिसरात वाढती लोकसंख्या बघता ज्या शहराच्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी सदैव मी तत्पर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली. चाकण शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी म्हणून जे प्रयत्न करता येतील ते मी करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी सांगितले. लवकरच शहरातील नागरिकांच्या समस्या व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतर्कता बाळगण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सहाय्याने सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा मानस असल्याचे अक्षय जाधव यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने पाणी प्रश्नाच्या बाबत जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांनी सकारात्मक बैठक घडून आली. त्यामुळे पाणी योजना लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो.
या बैठकीसाठी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना चाकण शहर प्रमुख अक्षय जाधव, बोरदर्याचे सरपंच किरण पडवळ आदि पदाधिकारी उपस्थित होते.