ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_660f678a17922.jpg)
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ
लोकसभा निवडणुक 2024 च्या यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्रीताई पाटील यांचा नामांकन अर्ज दि. ०४ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड उपस्थिती होते.
गेल्या दहा वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून देश आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाले आहे. अनेक कामे प्रगतीपथावर असून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपले सरकार काम करत आहे. महायुती सरकारच्या कामावर जनता समाधानी असून, यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून देखील आपलाच उमेदवार विजयी होईल हा विश्वास यानिमित्ताने संजय भाऊ राठोड यांनी दिला.
तर देशाच्या हितार्थ ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
यावेळी यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधीकारी, व कार्यकर्ते उपस्थीत होते.