कादवाच्या गळीत हंगामाची सांगता ३,२९,५८२ लाख मे. टन ऊस गाळप ४ लाख क्विंटल साखर निर्मिती

कादवाच्या गळीत हंगामाची सांगता ३,२९,५८२ लाख मे. टन ऊस गाळप ४ लाख क्विंटल साखर निर्मिती

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : कादवा सहकारी साखर साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही गळीत हंगामाची यशस्वी सांगता होत ३,२९,५८२ मेटन उसाचे  गाळप करुन सरासरी १२.२२% टक्के उतारा मिळवत चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती झाली आहे तर इथेनॉल ३ लाख ६३ हजार लिटर   व स्पिरीट ३३ लाख लिटर निर्मिती झाली आहे. 

यंदा दुष्काळी स्थिती असल्याने उसाची उपलब्धता कमी असल्याने त्यातच ऊस तोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कादवाने १४२ दिवसात गळीत हंगाम पूर्ण केला असुन गळीत हंगाम सांगता चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते गव्हानीत नारळ टाकून झाली. यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी हंगाम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक, कामगार, ऊसतोड कामगार,ऊस वाहतूकदार, मालपुरवठादार यांचे आभार मानत पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असून सर्वाधिक उतारा राहिल्याने चांगला भाव राहण्याची शक्यता असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. ऊस लागवड वाढावी यासाठी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना उधारीने खत वाटप करण्यात येत असून इफको १०-२६-२६ या खताची टंचाई असल्यामुळे इफको कंपणीचे १२-३२-१६ खते वाटप करण्यात येत आहे तसेच कारखान्याने उच्च प्रतीचे कंपोस्ट खत निर्मिती केले असून रु.१८९० प्रती टन प्रमाणे उधारीने विक्री सुरू आहे. तरी सभासदांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेत ऊस लागवड करावी असे आवाहन केले आहे.    

यावेळी युनियन अध्यक्ष भगवान जाधव, कांतीलाल राठोड यांची भाषणे झाली त्यानंतर सर्व मुकडदम यांचा सत्कार करण्यात आला  प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.आभार गंगाधर निखाडे यांनी मानले.याप्रसंगी  व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,संचालक मंडळ,सर्व विभागाचे खातेप्रमुख,कामगार उपस्थित होते.

कारखान्या तर्फे सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखरेची अंतिम मुदत मंगळवार  30 एप्रिल असून त्यानंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही तरी त्यापूर्वी सभासदांनी अपुर्ण शेअर्स रक्कम पुर्ण भरुन गटकार्यालयाशी संपर्क करुन आपले स्मार्टकार्ड घेवुन जावे व आपली सवलतीच्या दरातील साखर कारखाना कार्यस्थळावरुन घेवून जावी असे आवाहन कादवा प्रशासनाने केले आहे.