अनंतकृपा पंतसंस्थेच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांनी बाजी मारली, फक्त दोनच जुने शिलेदार निवडून आले...!
![अनंतकृपा पंतसंस्थेच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांनी बाजी मारली, फक्त दोनच जुने शिलेदार निवडून आले...!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63fe2b662f9e9.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील अनंतकृपा पतसंस्थेच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांनी दैदीप्यमान यश संपादक केले आहे. त्यातच जुन्या विद्यमान संचालक मंडळातून बिनविरोध सोडून फक्त २ उमेदवारांना विजय संपादन करता आला आहे.
अनंतकृपा पंतसंस्थेच्या निवडणुकीत एकूण ६ जागांसाठी १० उमेदवार आपले नशीब आजमावत होते. त्यात जुने नवे असा मिळून सहा उमेदवारांचा एक अनंतकृपा सहकारी पॅनल विरुद्ध ४ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील पॅनलचे ४ उमेदवारांनी विजय संपादन केला तर, अपक्ष २ उमेदवारांनी विजय खेचून आणला.
त्यातील अपक्ष नवख्या उमेदवारांच्या पैकी शशिकांत अर्जुन कड यांनी सर्वात जात उच्चांकी ७४६ मते मिळून विजय संपादन केला. शशिकांत कड यांचा गैस वितरणाचा व्यवसाय असल्याचे त्यांचा घरोघरी जनसंपर्क असल्याने त्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचे पहावयास मिळाले. त्याच बरोबर दुसरे अपक्ष म्हणून शंकर नारायण खराबी यांना ५५५ मते मिळून त्यांनी विजश्री खेचून आणला. या निवडणुकीत महत्वाची बाब पहावयास मिळाली ती म्हणजे जुने विद्यमान फक्त दोन संचालक निवडणून आले बाकी सर्व नवीन संचालकांना मतदारांनी आशीर्वाद दिले. सर्व नवख्या उमेदवारांनी एकाकी झुंज देऊन या निवडणुकीला चांगलीच रंगत चढली होती. पण काही नवख्या उमेदवारांचे प्रयत्न कमी पडले म्हणून त्यांना पराजय स्वीकारावा लागला.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे:
१) कड शशिकांत अर्जुन – ७४६
२) खराबी सतीश ज्ञानोबा – ६४०
३) कड सचिन सोपान – ५९६
४) खराबी माणिक गुलाब – ५९६
५) खराबी शंकर नारायण – ५५५
६) खराबी सोपान तुकाराम – ५५४
अनंतकृपा पतसंस्थेची निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून एच.एस.कांबळे यांनी काम पाहिले. तर या निवडणुकीसाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी सहकारी कर्मचारी यांच्यासह चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सर्व विजयी उमेदवारांचे News15 मराठी वाहिनीच्याकडून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन...!