पाऊस संपला असला तरी, आता शेतकऱ्यांवर बरसतोय संकटांचा पाऊस...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बालाजी घडबळे, नांदेड
आधीच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासला असतांना; सोयाबीनवर मोजॕक नावाचा, तर कापसावर थ्रीप्स, पांढरी माशीने ग्रासले असल्याने.! शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन काढनी चालु झाली असून, सोयाबीनवरील रोगामुळे शेंगा बरोबर न भरल्याने एकरी फक्त दोनच क्विंटल सोयाबीनचा उतार येत आहे.
कापसावरही अनेक कीडींनी हमला चढवल्यामुळे शेतकऱ्याचे पांढरे सोने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे करते की, काय? अशी भिती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. एकुणच सततच्या पावसाने नांदेड जिल्ह्यासह हदगाव तालुक्यातील बामणी फाटा, वाळकी, निवघा, तळणी भागातील सर्वच पिकांना अनेक रोगांनी ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 रुपयात सरकारने शेतकरी पिकांचा काढलेला विमा व विमा कंपन्यांची "पुणे लुटून साताऱ्याला दान" करण्याची मानसिकता यामुळे यावर्षी पिक विमा मिळेल की, नाही याचीही शाश्वती दिसत नसल्याने, शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.