खेड तालुक्यातील महिलांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश....!
News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
खेड(राजगुरूनगर): महिला पदाधिकाऱ्यांनी केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण, शहराचा विकास व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, महिलांचे प्रश्न ज्वलंतपणे मांडावेत. याकामी तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ म्हणून मी सदैव उभा राहील असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नवनियुक्ती दिलेल्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील महिला पदाधिकाऱ्यांशी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील बोलताना विश्वास व्यक्त केला.
खेड महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी ज्योती केशव अरगडे यांच्यासह विविध महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले की, शिरूर लोकसभेतील ५०० महिला पदाधिकाऱ्यांची स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी भेट घडवून महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दि. १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी १३.९० कोटी रकमेच्या राजगुरुनगर पंचायत समिती इमारत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात मोठमोठे उद्योग निर्माण व्हावे त्यासाठी प्रयत्नशील राहावे. मी त्यांना सर्वोतोपरी मदत करेल असे यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभागप्रमुख प्रशांत गाडे, खरपुडी खुर्द गावच्या सरपंच वनिता प्रशांत गाडे तसेच राजगुरुनगर शहरातील नयना झनकर यांचा नेतृत्वाखाली असंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी पुजाताई राक्षे, मिनाक्षीताई पवार, यशोदा चिमटे, शोभाताई वाळुंज, गीताताई भोगटे, स्वप्नाताई कुलकर्णी, सुनिता सांवत, मनिषाताई घुमटकर, पुष्पाताई टकले, सुनिताताई वाळुंज, वनिताताई आढारी, सुभद्रा जन्झरे, निशाताई भिंगारकर, आश्विनीताई शेळके, अनिताताई गुंजाळ, आशा वनघरे, मंजुताई भालेकर, गीता शिंदे, अलकाताई माने या सर्वांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.
या प्रवेशावेळी पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विशालआप्पा पोतले, महिला आघाडी तालुका संघटीका ज्योतीताई अरगडे, शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत, शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे, युवासेना उपतालुका प्रमुख योगेशभाऊ पगडे, युवासेना उपतालुका प्रमुख सचिनभाऊ चौधरी, युवासेना उपतालुका प्रमुख संदिपशेठ काचोळे, रोहकल गावच्या सरपंच प्रमिलाताई संदिपशेठ काचोळे, शेतकरी सेना उपविभाग प्रमुख प्रविणशेठ ठाणगे, वाहतूक सेना उपविभाग प्रमुख विकास थोरवे, चर्होली शिवसेना शाखाप्रमुख संदिपशेठ पगडे आदी उपस्थित होते.