प्रचार सभेत मतदाराला नेले खरे पण मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने.!

प्रचार सभेत मतदाराला नेले खरे पण मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने.!

असलम शेख, लातूर

लातूर राखीव लोकसभा मतदारसंघ हा पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा असून राजकीय पक्ष या मतदारसंघात जातीच्या धर्माच्या नावाखाली मत मागण्याचा प्रयत्न करीत आहेत.प्रस्थापित पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना ,भाजप यांनी मतदारांना गरिबी,भ्रष्टाचार,महागाई या समस्याचा पुळका दाखवून मताची झोळी भरली मात्र प्रत्येक पाच वर्षात तोच प्रश्न विकासाचा महामंत्र निवडणुकीसमोर परत घेऊन येण्याचा केवीलवानी प्रयत्न करतांना दिसत आहेत.

उदगीर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रियंका गांधी यांची सभा तर लातूर येथे भाजपचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची नुकीतीच सभा ज्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आल्या परंतु मतदार यांना विकासाशिवाय इतर काही ऐकायला मिळाले नाही.लातूर मतदार संघ पुर्वी पासून काँग्रेसच्या ताब्यात मात्र दोन वेळा भाजपच्या ताब्यात घेण्यात यश मिळाले असे प्रस्थापितांचे प्राबल्य असलेला लातूर मतदारसंघ हा चौथ्या टर्म मध्येही निवडणुकीत प्रस्थापिता पुढेच झुकु लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लातूर राखीव लोकसभा मतदारसंघ हा प्रस्थापितांचे वर्चस्व जपणार अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील उमेदवार प्रस्थापित पक्षाचा चेहरा घेऊन पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे परंतु मतदारांना प्रचार सभेत मतदाराला नेले खरे पण मतदाराचा कौल कोणाच्या बाजूनेे स्पष्ट होणे मुश्किल बनले आहे कारण प्रत्येक सभेला मतदाराला आमिष दाखवून प्रचार सभेत सामीलकरून घेतले असल्याची स्पष्ट होत आहे.